
बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सोमवारी (दि. ६) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीतील दिग्गज नेते बारामतीत उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान सोमवारी सकाळी नऊ वाजता त्या काटेवाडीत असतील. तेथून त्या कन्हेरी येथे जात मारुतीरायाचे दर्शन घेतील. सकाळी ९.३० वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये स्व. अजितदादा यांच्या स्मृती स्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या बस स्थानकानजीक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १२.१५ या वेळेत येथील प्रशासकीय भवनासमोरील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवनात दाखल होणार आहेत.


