संभाजी ब्रिगेडकडून पाठींब्यांचे पत्र जय पवार यांना देण्यात आले.
बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी व महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवा असणार आहेत. संभाजी ब्रिगेडने त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला आहे.
रविवारी येथील सहयोग सोसायटी या निवासस्थानी युवा नेते जय पवार यांना भेटून संभाजी ब्रिगेडने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे…
मा.अजितदादांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान कधीही विसरता न येणार असुन त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची भुमिका आहे. याच विचारातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.मनोजदादा आखरे यांच्या सुचनेनुसार संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिलेला आहे… यावेळी सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक इ. बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष विनोद जगताप, बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे आणि जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप उपस्थित होते.


