बारामती : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
काँग्रेसकडून बारामतीत ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे.
महायुतीकडून बारामतीची निवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लढणार असल्याचे निश्चित आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीला बिनविरोध व्हावे, अशी इच्छा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.
परंतु महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने येथे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश मोरे हे येथील काँग्रेसचे उमेदवार असतील.
याशिवाय शनिवार अखेर १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.






1 thought on “बारामतीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी”