बारामती :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. बारामती शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. बारामती शहरातील बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता विविध मान्यवरांसह नागरिकांनी अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने पूजा पाठाचा कार्यक्रम झाला. यानंतर माजी क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार तसेच नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, माजी नगराध्यक्ष भारत अहिवळे, इम्तियाज शिकीलकर, आरोग्य समिती सभापती नवनाथ बल्लाळ, बांधकाम समिती सभापती अमर धुमाळ, विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे, बसपाचे नेते काळुराम चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, युवकचे शहराध्यक्ष अभिजीत घाडगे, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अॅड. शिरीष कुलकर्णी, माजी नगरसेवक ॲड सुभाष ढोले, नगरसेविका संघमित्रा चौधरी, प्रतिभा खरात, अनुप्रिता तांबे, सारिका अमोल वाघमारे, नगरसेवक निलेश इंगुले, राजेंद्र सोनवणे,बिरजू मांढरे, विशाल हिंगणे, सोमनाथ गजाकस, शर्मिला ढवाण, मनिषा बनकर, सूरज सातव,आप्पा अहिवळे, रमेश मोरे, अनिकेत मोहिते, ॲड मनसे चे नेते ॲड विनोद जावळे, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष गणेश शिंदे आदींसह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. दिवसभर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे, सोमनाथ रणदिवे, अनिकेत मोहिते, अमोल वाघमारे, विनय दामोदरे, बाबू पवार, प्रेषित चव्हाण, शुभम अहिवळे, चंद्रकांत भोसले यांच्यासह इतर सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. दरम्यान शहरातील सिद्धार्थ नगर बुद्ध विहार या ठिकाणी सम्यक सोशल क्लबच्या वतीने नगरसेवक माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण व अभिजीत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पूजा पाठाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. दरम्यान या ठिकाणी भीम गीतांचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन करून या कार्यक्रमात सुरुवात झाली. बारामती शहरातील सटवाजी नगर या ठिकाणी माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या पुढाकाराने त्रिरत्न नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने आंबेडकर जयंती निमित्त सलग ३३ वर्षापासून अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे, यावेळी देखील सदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक माजी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले. बारामती शहरातील पंचशील नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने बुद्ध विहारात पूजा पाठाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलभीम सोनवणे, सुरज सोनवणे, जितेंद्र दामोदरे, प्रमोद अहिवळे, ॲड अमोल सोनवणे, शरद सोनवणे, जयंत खरात, शुभम वाघमारे, प्रवीण बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना, त्याचबरोबर इतर संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
पुस्तक खरेदीसाठी अनुयायांची गर्दी
वाचाल तर वाचाल असा महान संदेश देणाऱ्या महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधत पुतळा स्मारक परिसरात माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन प्रेरणा पुस्तकालयाचा स्टोल लावण्यात येतो.यावर स्टॉलवर बहुजन महापुरुषांच्या विचारांची समाज प्रबोधनात्मक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतात.महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले सुजाण अनुयायी या पुस्तक स्टॉल भेट देऊन पुस्तके खरेदी करत असतात.दरवर्षी याठिकाणी लाखो रुपायांच्या पुस्तकांची विक्री होत असल्याची माहिती अहिवळे यांनी दिली.तसेच सत्यशोधक फाउंडेशन कडून बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित साकारलेला आकर्षक देखावा चर्चेचा विषय ठरत आहे.http://BHIMJAYANTIBARAMATI



